अमळनेर तालुक्यातील गलवाडेनजीक अपघात
अमळनेर ( प्रतिनिधी) – भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार तर दुसऱ्या जखमीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजता तालुक्यातील गलवाडे रस्त्यावर घडली. ट्रकचालकाविरुध्द अमळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ईश्वर पाटील व समाधान पाटील अशी मयतांची नावे आहेत. ईश्वर पाटील व समाधान पाटील (दोन्ही गलवाडे) हे दोघे दुचाकीने ( एमएच १९ ईडी ९५५९) अमळनेरकडे जात असताना समोरून ट्रकने (आरजे १४ जीजे ९१३६) भरधाव वेगात येऊन धडक दिली. त्यात दुचाकीसह दोघेही खाली कोसळले. गावातील लोकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ईश्वर पाटील यांना मृत घोषित केले.
समाधान पाटील याला धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी ट्रकचालकाविरुध्द अमळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.









