तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन
जळगाव (प्रतिनिधी)- बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सध्या अनेक शारीरिक समस्या उद्भवत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी जळगावात उद्या, गुरुवार २५ डिसेंबर २०२५ रोजी भव्य ‘मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर दुपारी १२ वाजता भास्कर मार्केट समोरील ‘राम टोटल बॉडी चेकअप सेंटर’ येथे पार पडणार आहे.

शिबिरामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराची सखोल तपासणी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बॉडी स्कॅनिंग,शरीरातील फॅटचे प्रमाण, उंची व वजनाचे संतुलन. स्त्री आरोग्य, आणि वंध्यत्व यांसारख्या समस्यांवर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पचनशक्तीची सद्यस्थिती आणि ती सुधारण्याचे उपाय,मसल स्ट्रेन्थ आणि त्यातील फॅटचे प्रमाण, लिव्हर, किडनी आणि स्वादुपिंडाभोवती असणाऱ्या घातक चर्बीची तपासणी, बी.एम.आय आणि बॉडी वय तपासणी,
राज्यातील नामांकित तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या शिबिरात महाराष्ट्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ उपस्थित राहून रुग्णांना आरोग्यविषयक सल्ले देणार आहेत. यामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध वेलनेस कोच डॉ. दिलीप कचेरे, सोलापूरचे मानसोपचारतज्ज्ञ व वेलनेस कोच डॉ. हर्षल थडसरे आणि जळगाव येथील डॉ. प्रभू व्यास यांचा समावेश आहे.
नाव नोंदणी अनिवार्य
शिबिरासाठी जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी ‘राम टोटल बॉडी चेकअप सेंटर’, भास्कर मार्केट समोर, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. उद्या दि. २५ डिसेंबर २०२५ (गुरुवार) रोजी
वेळ: दुपारी १२:०० वाजता
स्थळ: राम टोटल बॉडी चेकअप सेंटर, भास्कर मार्केट समोर, जळगाव.









