भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मारुती सुझुकी कंपनीची ग्रे रंगाची ईको कार चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी डेनिस जोसेफ रोड्रिक्स (वय ५४, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. पालखी हॉटेल मागे, वरणगाव रोड, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची MH-15-GF-4457 क्रमांकाची ईको कार ही घरासमोर उभी करण्यात आली होती. २२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११.३० ते २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सदर कार चोरून नेली.
चोरीस गेलेल्या कारची अंदाजे किंमत १ लाख ५० हजार रुपये असून, या घटनेची नोंद २३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०.३९ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३९/२०२५ अन्वये करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोहेकॉं/२६९२ विजय नेरकर हे करीत असून, अद्याप आरोपी अटक करण्यात आलेली नाही. भुसावळ शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.









