रावेर तालुक्यातील अजंदे फाट्यावर घटना
रावेर ( प्रतिनिधी ) – ऐनपूर येथून चिवडा विक्री करून सायकलवर परत येत असताना महामार्गावरील अजंदे फाट्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनिल जवाहरलाल मिश्रा (५५. रा. भोर स्टेशन) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि.२० रोजी रात्री १० वाजता घडली. मयताच्या नातेवाइकांनी दोन दिवस उशिराने याबाबत रावेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रावेर पोलिसांत अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातानंतर मिश्रा हे घटनास्थळी पडून होते. त्यांना इतर वाहनचालकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. पोलिस आणि मिश्रा कुटुंबियांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी अपघाताचा प्रकार समोर आला. मयताची मुलगी शीतल तायडे यांनी फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करत आहेत.









