जैन हिल्स येथे ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५ सुरवात
जळगाव (प्रतिनिधी) – भारताने शेतीत गेल्या काही दशकांत खूप प्रगती केली आहे. अन्नसुरक्षेतेमध्ये स्वालंबन मिळविले आहे. अन्नधान्यासोबतच फलोत्पादन वाढले आहे, मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोषणमूल्ये जोपासली गेली पाहिजे. त्यासाठी मातीचे आरोग्य सांभाळणे, पाण्याचे व्यवस्थापन करणे, खतांचे कार्यक्षमतेने वापर करणे आवश्यक आहे. टिश्यूकल्चर, ठिबक, स्प्रिंकलर तंत्रज्ञानाला विज्ञानाचा आधार असून त्याचा वापर वाढला पाहिजे. जल, जमिन, जंगल, जलवायू, जनता यांच्यात शास्त्रोक्त काम करण्यासाठी शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक, विविध संशोधन संस्था यांच्या सामूहिक प्रयत्नातून पर्यावरणाचा ऱ्हास न होता फलोत्पादनामध्ये मूल्यवर्धनाच्या दृष्टीने शाश्वता आणता येईल, असा विश्वास दिल्ली येथील नॅशनल अकॅडमी ऑफ अॅग्रीकल्चर सायन्सेस (एनएएस) चे अध्यक्ष डॉ. हिमांशू पाठक यांनी व्यक्त केले.
देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ चे आयोजन केले आहे. उद्गघाटनाप्रसंगी डॉ. हिमांशू पाठक बोलत होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर नागपूरचे इंडियन सोसायटी ऑफ सिट्रसचे अध्यक्ष डॉ. दिलीप घोष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, शास्त्रज्ञ डॉ. एन. कृष्णकुमार, गांधी रिसर्च फाऊंडेशचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अय्यंगार यांची उपस्थिती होती. जैन हिल्स् गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात दीपप्रज्वलनाद्वारे उद्धाघाटन झाले. संगीता भट्टाचार्य, डॉ.व्यंकटश रमण बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी आभार मानले. परिषदेच्या उद्घाटन सत्रानंतर ऑरेज फिस्टा प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांनी केले.
डॉ. हिमांशू पाठक म्हणाले, अन्नधान्याच्या बाबतीत चांगले काम झाले. आपण आयातदार होतो. आता निर्यातदार, पुरवठादार झालो आहोत. कोविड काळात देशाने जगाला अन्न पुरविले. हे शेतकरी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ यांच्या मदतीने शक्य झाले आहे. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून काम व्हायला हवे. लिंबूवर्गीय पिकांत काम केले जात आहे. पण ढासळलेली उत्पादकता व अन्य समस्यांना दूर करण्यासाठी एकत्रीत प्रयत्न हवे आहेत. शेतकऱ्यांना शाश्वत, पर्यावरणपूरक उपाय, तंत्र पुरविण्याची आवश्यकता आहे. जैन इगिरेशनसारख्या संस्था विज्ञानासोबत तंत्रज्ञानाला धरून पाणी, पर्यावरण यासंबंधी चांगले काम करीत आहेत. पाणी, माती व्यवस्थापनातून बुंदेलखंडमध्ये फळपिके वाढली. केंद्र सरकार त्यासाठी कार्यक्रम, प्रयत्न आणते. नवे शास्त्र, तंत्र हवे आहे, असेही डॉ. हिमांशू पाठक म्हणाले.
डॉ. दिलीप घोष यांनी प्रास्ताविक केले. त्यात ते म्हणाले, भारत जगातील लिंबूवर्गीय फळांच्या (सायट्रस) उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे (चीन आणि ब्राझीलनंतर). तरीही या क्षेत्राला हवामान बदल, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, दर्जेदार रोपांच्या कलमांची कमतरता, बाजारभावातील अनियमितता अशी मोठी आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित परिषदेचा मुख्य विषय ‘भरघोस उत्पादन, हवामान बदल आणि मूल्य साखळी व्यवस्थापन’ आहे, जो या समस्यांवर लक्ष केंद्रित करून शाश्वत उपाय शोधण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे सांगत संशोधक म्हणून आपल्याकडील ज्ञानाचा वापर समाजातील प्रत्येक घटकाला झाला पाहिजे त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाला सोबत घेऊन लिंबू वर्गीय फळांमध्ये काय सुधारणा करता येईल यासाठी ही परिषदेत महत्त्वाची असल्याचे म्हणाले. स्वस्थ भारत समृद्ध भारत घडविण्यासाठी पुढे आले पाहिजे. कारण आरोग्यामध्ये लिंबूवर्गीय फळांचे महत्त्व मोलाचे आहे.
पौष्टीक अन्न पिकवू आणि देश घडवू – डॉ. एन. कृष्ण कुमार
डॉ. एन. कृष्णकुमार म्हणाले की, मनुष्याला आरोग्यदृष्ट्या खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मधुमेहासह अन्य व्याधींनी आपण त्रस्त आहोत. आपण अन्नसुरक्षा तर मिळवली मात्र पौष्टीक सुरक्षेत अजूनही भारत मागे आहे. वाढ, विकास आणि देखभाल यासाठी मूल्यवर्धित पोषकतत्व असलेल्या फळांच्या सेवनाकडे आपण वळले पाहिजे. फलोत्पादन हे सर्वात्तम उत्तर पोषणाचे संयोजनासाठी आहे. रोज सकाळी एक ग्लास संत्र्याचा ज्यूस प्यायलाने आरोग्य सांभाळले जाते. विदेशात भारतीय लोणच्यांना खूप मागणी आहे त्यासाठी लिंबूवर्गीय फळांचे लोणचे तयार करुन पाठविता येऊ शकते. निर्यात वाढल्यास देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामुळे देशांतर्गत वापरासोबतच निर्यातीसाठी अधिक उत्पादन, पोषणमूल्ययुक्त आणि सुरक्षित अन्ननिर्मिती करणे आवश्यक आहे. मोसंबी हे उत्पादन, लागवडीचा कालावधी आणि उत्पन्नाच्या दृष्टीने अतिशय उत्तम पीक आहे. मानांकीत नर्सरीतूनच रोगमुक्त रोपं घेतली पाहिजेत.
शेतकरी नवप्रेरक – डॉ. सुदर्शन अय्यंगार
विशेष अतिथी म्हणून बोलताना गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अय्यंगार म्हणाले की, अर्थशास्त्रासोबत नैतिकता व्यवहारात आणली पाहिजे. संशोधक, वैज्ञानिक, अभ्यासकांनी केलेले संशोधन हे काय आहे आणि कशासाठी उपयुक्त ठरू शकते. हे प्रश्न विचारून महात्मा गांधीजींना अभिप्रेत असलेला समाजाची निर्मिती केली पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: शेतीत केलेले बदल हे अमूर्त मॉडेल ठरतात ते नवप्रेरक असतात. भवरलाल जैन हे शेतकरी ते शेतीपूरक उद्योजक होऊ शकले त्यांनी समाजातील अंतिम घटकांमध्ये परिवर्तनाचा विश्वास निर्माण केला.
संत्र्याला मूल्यवर्धित अन्नापैकी एक मानावे – अनिल जैन
शेत, शेतकरी आणि पर्यावरण संवर्धनासोबतच फलोत्पादन कसे वाढविता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. अंतिम ग्राहकांसाठी ‘सुफर फुड’ कसे देता येईल यासाठी लायब्ररी, लॅब, लॅण्ड चा सुयोग्य वापर केला पाहिजे. किती उत्पादन झाले यापेक्षा शेतकऱ्याला किती उत्पन्न एकरमागे मिळाले हे महत्त्वाचे आहे. जगातील प्रतिभावन शास्त्रज्ञ हे भारतात आहेत सर्वांगिण दृष्ट्या संशोधनाचा प्रचार प्रसार हा शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे. ज्ञानाचे हस्तांरणार भर दिला. “चला, फळांचा रस घेऊया आणि आरोग्य सांभाळू या.” असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला. २०२५ ची ही परिषद जी संत्रासाठीच्या भविष्यासाठी महत्वाची ठरेल. पुढील २५ वर्षांत आपण हे की हा एक असा प्रसंग होता ज्यामुळे हे परिवर्तन घडवणारा विचार निर्माण झाला. मान्यवरांनी जैन इरिगेशन निर्मित “सिट्रस कल्टिवेशन गाइड” पुस्तकाचे प्रकाशन केले. परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. लिंबूवर्गीय फळ पिकांसंबंधित पिकवाणांचे सादरीकरण झाले.
जैन इरिगेशनतर्फे दोन वाणांचे लॉन्चिंग..
जैन इरिगेशन सिस्टीम्स तर्फे लिंबूवर्गीय फळांमध्ये जैन स्वीट ऑरेंज-६ व जैन मॅन्डरीन-१ हे दोन वाण नव्यानेच विकसीत केले आहे. त्यांचे हेमचंद्र पाटील, शिवाजीराव चव्हाण, नवीनकुमार पेठे, अजित जोशी, संतोषकुमार पेठे, के. टी. रेड्डी, एन. श्रीधर, गोणकुंठा लेपाक्षी, व्ही. उमामहेश, बी. व्ही. रेड्डी. या दहा शेतकऱ्यांना ही दोघं वाणांची रोपं देऊन सत्कार करण्यात आला. जैन मॅन्डरीन-१ हे दुसऱ्याच वर्षी उत्पादन देणारं वाण असून ते नागपूर संत्राला उत्कृष्ट पर्याय ठरू शकते असे मत डॉ. मिलींद लधानिया यांनी सांगितले.
मान्यवरांचे पुरस्कार..
लिंबूवर्गीय परिषदेमध्ये फेलोशिप प्रदान करण्यात आली. त्यात डॉ. चंद्रिका रामादुगु (कॅलिफोर्निया विद्यापीठ, अमेरिका), डॉ. मंजुनाथ केरेमने (USDA, अमेरिका), डॉ. अवी साडका (वोल्कानी संस्था, इस्रायल), डॉ. शैलेंद्र राजन (माजी संचालक, ICAR-CISH), डॉ. एम. कृष्णा रेड्डी (माजी शास्त्रज्ञ, ICAR-IIHR), डॉ. अवतार सिंग (माजी शास्त्रज्ञ, IARI), डॉ. आकाश शर्मा (प्राध्यापक, SKUAST-जम्मू), डॉ. शिव शंकर पांडे (IASST, गुवाहाटी), डॉ. आर. एम. शर्मा (प्राध्यापक, IARI), डॉ. अवतार सिंग (माजी प्रिंसिपल सायंटिस्ट, ICAR), डॉ. आकाश शर्मा (शेर-ए-काश्मीर युनिव्हर्सिटी, जम्मू), डॉ. सुशंकर पांडे (DBT रामानुजन फेलो, आसाम), डॉ. आर्यन शर्मा (प्रोफेसर, IARI, न्यू दिल्ली) यांचा फेलोशिप देऊन गौरव करण्यात आला.









