नशिराबाद नगरपालिकेवर महायुतीची सत्ता, एमआयएमने देखील उघडले खाते
नशिराबाद ( वार्ताहर ) – येथील होमगार्ड प्रशिक्षण केंद्र येथे नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. निकाल निवडणूक निर्णय अधिकारी शितल राजपूत यांनी जाहीर झाले असून या निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश पाटील यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार गणेश चव्हाण यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार गणेश चव्हाण यांना एकूण मते ७७३२ मिळाली तर, महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश नारायण पाटील यांना ८५७९ इतकी मते मिळाली प्रतिस्पर्धी पेक्षा त्यांना ८४७ मतांनी निवडणूक निर्णय अधिकारी शितल राजपूत यांनी महायुतीचे उमेदवार योगेश नारायण पाटील यांना विजयी घोषित केले.नगर परिषदेच्या सदस्य निवडणुकीत महायुतीने स्पष्ट आघाडी घेतली असून महायुतीच्या उमेदवारांनी सर्वाधिक १३ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच महायुती पुरस्कृत एका उमेदवाराचाही विजय झाल्याने महायुतीकडे एकूण १४ जागांचे संख्याबळ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष उमेदवारांनी २ जागांवर विजय मिळवला असून एमआयएम पक्षाचे उमेदवारही २ जागांवर विजयी झाले आहेत. या निकालामुळे नशिराबादच्या नगर परिषदेवर भाजप व शिवसेना गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
विजयी दिग्गज उमेदवारांमध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या लीना महाजन, माजी सरपंच पंकज महाजन, माजी सरपंच विकास पाटील, माजी उपसरपंच विकास पाटील यांचा समावेश आहे. तर शिवसेनेचे शहर प्रमुख विकास धनगर यांनी वॉर्ड नंबर १० मधून बंडखोरी करीत त्यांच्या पत्नीचा अपक्ष अर्ज दाखल केला होता. या जागेवर भारताबाई विकास धनगर या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या आहेत.
दरम्यान, नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्ष उमेदवारांनी २ जागांवर विजय मिळवला असून एमआयएम पक्षाचे उमेदवारही दोन जागांवर विजयी झाले आहेत. या निकालामुळे नशिराबादच्या नगर परिषदेवर महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रभागनुसार विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक १ अ कोमल प्रशांत नारखेडे, ब पंकज शामकांत महाजन, शिंदे शिवसेना गट विजयी
प्रभाग क्रमांक २ अ लीना पंकज महाजन शिंदे शिवसेना गट, ब मनोज चंद्रकांत पाटील अपक्ष बीजेपी पुरस्कृत विजयी
प्रभाग क्रमांक ३ अ हीना बी मो. रईस कासार, ब सय्यद वासिफ अली सय्यद निसार अली विजयी
प्रभाग क्रमांक ४ अ हनीफा बी मोहम्मद खलील शाह ब शेख असलोमुद्दीन एजाजोद्दीन विजयी
प्रभाग क्रमांक ५ अ शैला कैलास व्यवहारे, ब कीर्तिकांत पंडित चौबे विजयी
प्रभाग क्रमांक ६ अ .. सुवर्णा सचिन महाजन ब लालचंद प्रभाकर पाटील भाजपा विजयी
प्रभाग क्रमांक ७ अ जनाबाई भगवान रंधे, ब चेतन दगडू बऱ्हाटे, शिंदे शिवसेना गट विजयी
प्रभाग क्रमांक ८ अ शेख नसरीन बानो मुस्ताक, ब मोहम्मद इकबाल शेख इब्राहिम विजयी
प्रभाग क्रमांक ९ अ कमरोणिसा सय्यद बिस्मिल्ला मन्यार ब.. आसिफ शेख गनी शेख मण्यार विजयी
प्रभाग क्रमांक १० अ भारताबाई विकास धनगर अपक्ष ब. विकास गणपत पाटील शिंदे शिवसेना गट विजयी.









