पुण्यतिथीनिमित्त रविवारी मिरवणूक पालखी सोहळ्यात समाजबांधवांची उपस्थिती
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ जळगावतर्फे रविवार दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सवाद्य मिरवणूक पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. मिरवणुकीत महिला व मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध वेशभूषा साकारल्या प्रसंगी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
सुरुवातीला कांचन नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ संताजी जगनाडे महाराज आणि संताजी कडोजी महाराज यांच्या प्रतिमेला मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी यांच्यासह समाजबांधवांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर समाज बांधवांनी संतांच्या जय घोषामध्ये मिरवणुकीला प्रारंभ केला.
सदर मिरवणूक ही कांचन नगर, चौगुले प्लॉट, भिलपुरा पोलीस चौकी, घाणेकर चौक मार्गे पोलनपेठेतील दत्त मंदिरापर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये विविध वेशभूषा करणाऱ्या महिला व मुलींसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर मिरवणूक व पालखी सोहळ्याचे हे पंधरावे वर्ष आहे. यावेळी उपाध्यक्ष सिताराम देवरे, सचिव अनिल पाटील, भगवान फकीरा सोनवणे, सचिन चौधरी, दिलीप चौधरी, भगवान चौधरी, डी. एम. चौधरी, सिंधुताई चौधरी, शोभाताई चौधरी यांच्यासह महिला व पुरुष समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.










