उबाठा पक्षाचे मनिषा पवार यांचा दारुण पराभव
रावेर ( प्रतिनिधी ) – येथील नगरपालिकेच्या अतिशय अटीतटीच्या व चूरशीच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली. नगराध्यक्ष पदाचे शिवसेना ( उबाठा)पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनीषा रवींद्र पवार यांचा पराभव करीत रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या संगीता भास्कर महाजन या विजयी झाल्या आहेत. तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष रिया शीतल पाटील यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे.
पालिकेच्या २३ नगरसेवक पदासाठी २ डिसेंबरला मतदान झाले होते. भाजपची प्रभाग २ मधील एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. पक्ष चिन्हावर लढलेल्या भाजपला ९ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी अजित पवार गटाला १०, काँग्रेसला २ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला १ जागा मिळाल्या आहेत. २ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. संगीता महाजन यांच्या विजयामुळे रावेर नगरपालिकेवर भाजपने झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत जुन्यांना मतदारांनी सपशेल नाकारले असून तरुण व नवख्यांना संधी दिली आहे.
आज सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात प्रशिक्षणार्थी उप जिल्हाधिकारी दीपा जेधे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बी ए कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली. सहा टेबलवर सात फेऱ्याद्वारे मतमोजणी करण्यात आली.
निवडणूक निकाल ऐकण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेवून पोलीस प्रशासनाने जुना सावदा रोडच्या कॉर्नर पासून तहसील कार्यालयाकडे जाणारा एकेरी रस्ता बॅरिकेट्स लावून वाहतुकीसाठी बंद केला होता. निकाल ऐकण्यासाठी शहरातील तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार संगीता भास्कर महाजन यांना १४०९३ मते मिळाली असून प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या (उबाठा )उमेदवार मनीषा रवींद्र पवार यांच्या पेक्षा त्यांना ६४७५ मते अधिक मिळाली आहेत. मनीषा पवार यांना ७६१८ मते मिळाली आहेत.
विजयी झालेले प्रभाग निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे :
प्रभाग 1 : नितीन भगवान महाजन अपक्ष(1584), सपना योगेश महाजन भाजप (1515)
प्रभाग 2 : राजेश सुधाकर शिंदे भाजप( 1383) जयश्री नितीन महाजन भाजप (बिनविरोध)
प्रभाग 3 : अरुण दत्तात्रय आस्वार भाजप (1061) योगिता भूषण महाजन भाजप(1457)
प्रभाग 4 : अर्चना योगेश पाटील भाजप (1411) गणेश प्रभाकर पाटील भाजप (1382)
प्रभाग 5 : नरेंद्र विशवनाथ वाघ राष्ट्रवादी(722) सालेहा कौसर अल्ताफ खान राष्ट्रवादी(900)
प्रभाग 6 : सुमय्या बी जाविद राष्ट्रवादी(2268) आसिफ मोहम्मद दारा मोहंमद राष्ट्रवादी(2118)
प्रभाग 7 : सानिया परवीन शेख साऊद राष्ट्रवादी(769) मोहम्मद समी मोहम्मद आसिफ राष्ट्रवादी(822)
प्रभाग 8 : रुबीनाबी इरफान शेख राष्ट्रवादी(731) शेख सादिक अब्दुल नबी राष्ट्रवादी(831)
प्रभाग 9 : शाहीन परवीन सफदार काँग्रेस(848) दारा मोहंमद जाफर मोहंमद राष्ट्रवादी(753)
प्रभाग 10 : अनिता मुरलीधर तायडे काँग्रेस(522), गोपाळ रत्नाकर बिरपण राष्ट्रवादी(642)
प्रभाग 11 : सीमा आरिफ जमादार भाजप(547)
गणेश सोपान पाटील राष्ट्रवादी श. पवार(622)
प्रभाग 12 : प्रमिला चुडामन पाटील अपक्ष(1062) राजेंद्र पंढरीनाथ चौधरी भाजप(1348)









