समाजबांधवांनी उपस्थिती देण्याचे आवाहन
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ जळगावतर्फे रविवार दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सवाद्य मिरवणूक पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मिरवणुकीत सहभाग घेणाऱ्या महिला व मुलांसाठी वेशभूषा स्पर्धादेखील आयोजित करण्यात आले आहे.
याबाबत मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम चौधरी यांनी माहिती दिली आहे. श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी दुपारी अडीच वाजता सवाद्य मिरवणूक व पालखी सोहळा हा कांचन नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्र जवळ येथून निघणार आहे.
सदर मिरवणूक ही कांचन नगर, चौगुले प्लॉट, भिलपुरा पोलीस चौकी, घाणेकर चौक मार्गे पोलनपेठेतील दत्त मंदिरापर्यंत निघणार आहे. मिरवणुकीमध्ये विविध वेशभूषा करणाऱ्या महिला व मुलींसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्यांचे कलश उत्कृष्ट अशा महिला व मुलींना गौरविण्यात येणार आहे. सदर मिरवणूक व पालखी सोहळ्याचे हे पंधरावे वर्ष आहे. समाज बांधवांनी वेळेवर कांचन नगर येथे उपस्थित द्यावी व अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









