भुसावळ येथील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील खडका रोड भागात असलेल्या गौसिया नगरमधील रहिवाशी शेख रशीद शेख कालू (वय ५५) यांनी सल्फ्युरिक ऍसिडचे सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांनी सावकारीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
त्यांच्या खिशात व्याजाने घेतलेल्या व व्याजाच्या परत दिलेल्या रकमांचा तपशील व सावकारांची नावे आढळून आलेली आहेत. शेख रशीद शेख यांनी अॅसिड सेवन केले. ते अवैध सावकारीच्या छळामुळे मानसिक तणावात होते, अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली आहे. पोलिसांना मिळालेल्या चिट्ठीत सावकारांची नावे आहेत. कोणाकडून किती पैसे घेतले व आजपर्यंत कोणाला किती पैसे दिले ? याचा सविस्तर तपशील या चिट्ठीमध्ये देण्यात आलेला आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपास करीत आहे.









