माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते सत्कार
जळगाव (प्रतिनिधी) :- प्रतिनिधी येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रा. पियूष वाघ यांनी पीएच.डी. पदवी संपादन करून महाविद्यालयाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. ते गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमधील पहिले डॉक्टरेट पदवीधारक ठरले आहेत. त्यांना १५ डिसेंबर रोजी पारूल युनिव्हर्सिटी, वडोदरा (गुजरात) येथील कॅम्पसमध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रा. पियूष वाघ यांनी सन २०२१ मध्ये पीएच.डी.साठी प्रवेश घेतला व संशोधनाचा प्रवास सुरू केला. मार्गदर्शक डॉ. रवींद्र एच. एन. यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रा. पियूष वाघ हे गोदावरी परिचर्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, महाविद्यालयातून पहिले डॉक्टरेट पदवीधारक म्हणून त्यांची अधिकृत नोंद झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील,डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, प्रशासक प्रवीण कोल्हे यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.










