तुळसाई नगर भागात समाजबांधवांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील तुळसाई नगर भागातील श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज मंदिर येथे श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त समाजबांधवांकडून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संताजी जगनाडे महाराज यांचा जयघोष करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते मूर्तीला माल्यार्पण करून अभिवादन समाजबांधवांनी केले. सामाजिक एकता आणि आध्यात्मिक वारसा जपण्याच्या उद्देशाने या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रशांत सुरळकर, अनिल चौधरी, विनोद चौधरी, सुहास चौधरी, चेतन चौधरी, राहुल चौधरी, मंगेश चौधरी, मोहित चौधरी, सागर चौधरी, मयुरेश चौधरी, अशोक चौधरी, बंटी चौधरी, धैर्यशील चौधरी, सचिन चौधरी, सुशील चौधरी, आप्पा चौधरी, मंगेश चौधरी, प्रदीप चौधरी, योगराज चौधरी यांच्यासह परिसरातील इतर मान्यवरांची उपस्थिती होती.









