जळगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव तालुक्यातील झुरखेडा शिवारातील गट क्रमांक २५६ मध्ये शेतातून मक्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
१५ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपासून १६ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतात साठवून ठेवलेला सुमारे १५ क्विंटल मका लंपास केल्याचे निदर्शनास आले. या चोरीमुळे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शेतकरी लहू श्रीधर पाटील (वय ५८, रा. वाकटुकी, ता. धरणगाव) यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास धरणगाव पोलिसांकडून सुरू आहे.









