चोपडा तालुक्यात धनवडी चौकात अपघात
चोपडा ( प्रतिनिधी ) – येथील धनवाडी चौफुलीवर बस व दुचाकीचा अपघात झाला. यात एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगल कृष्णनाथ साळुंखे (१८, मांजरोद, ता. शिरपूर) असे मयत तरूणाचे नाव असून महेश अनिल पाटील (१९, चांदसनी, ता. चोपडा) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १५ रोजी दुपारी ३:२५ वाजेच्या सुमारास धनवाडी चौफुलीवर अडावदकडून येणाऱ्या बसने दुचाकीला धडक दिली. अपघातात मंगल साळुंखे हे जागीच ठार झाले. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.









