भितीपोटी आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय
चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यातील तरवाडे येथून धनश्री उमेश शिंदे (वय ९) ही मुलगी दि.१२ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून तरवाडे गावातून बेपत्ता झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून तिचा तरवाडे गावासह परिसरात जळगाव येथील एलसीबीच्या टीमसह पोलीसांची १० पथके तिचा कसून शोध घेत होते. याशिवाय संपूर्ण परिसर ड्रोन कॅमेर्यांनी पिंजून काढला होता. यानंतर आज मंगळवारी संकाळी तरवाडे शिवारातीलच गणेश गरुड यांच्या शेतातील विहिरीत धनश्री हिचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, धनश्री हिने शिक्षिकेच्या पर्समधून पैसे काढून घेतले होते, तिच्या सामोर शिक्षिकेने वडिलांना फोन करुन दोघेजण उदया शाळेत या, असे सांगितले होते. त्यानंतर सांयकाळी ०५.१५ वाजेनतंर शाळा सुटल्यापासून धनश्री घरी गेली नव्हती. पाच दिवसांपासून तिचा पोलीस शोध घेत होते. एका शेतात तिची शाळेची बॅग आढळून आली होती.
दरम्यान, त्यानंतर आज त्याच ठिकाणापासून १०० मीटरच्या अंतरावरील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला आहे. धनश्रीने भितीपोटी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.पंरतु, पोलीस या संपूर्ण घटनेचा कसून तपास करीत आहेत. तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तरवाडे येथे शोककळा पसरली









