अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
आत्महत्येस प्रवृत्त केल्याची मुलीच्या वडिलांची तक्रार
अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील एका गावातील बेपत्ता तरुणीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका गावातील ही १८ वर्षीय तरुणी १० रोजी दुपारी ४ वाजता घरातून काहीही न सांगता निघून गेली होती. तिचा शोध लागला नव्हता, १२ रोजी दुपारी तिचा मृतदेह एका शेतातील विहिरीत आढळून आला. मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार गावातील विजय ऊर्फ राज विलास बागुल याच्याशी मुलीचे प्रेमसंबंध होते. यापूर्वीही मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. विजय याने मानसिक त्रास दिल्याने तिला नैराश्य आले होते. त्यातून मुलीने आत्महत्या केली, अशी तक्रार तिच्या पित्याने पोलिसात दिली. त्यावरून विजयविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









