घटना सीसीटीव्हीत कैद
चाळीसगाव (प्रतिनिधी) : घरासमोर उभी असलेली दुचाकी मध्यरात्रीनंतर अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिल्याची घटना शहरातील शनि मंदीर परिसरात घडली आहे. पेटवून दिलेली दुचाकी ही हॉटेल सुदामाचे संचालक शाम दोधा पाटील यांच्या मालकीचीआहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल कारणात आला आहे.
११ डिसेंबरला मध्यरात्रीनंतर शनी मंदिराजवळील शाम पाटील यांच्या घराबाहेर त्यांच्या मालकीची दुचाकी उभी होती. या वेळी तोंडाला रूमाल बांधलेल्या दोघांनी या परिसराची टेहाळणी करत ही दुचाकी पेटवून तेथून पळ काढल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाले आहे. यात एकाने अंगात लाल तर दुसऱ्याने काळा रंगाचा जरकीन घातलेला असल्याचे दिसत आहे. तर वाहनाने पेट घेतल्यानंतर तेथून ते पळून गेले. याप्रकरणी शाम पाटील यांनी तक्रार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.









