विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांचे आदेश
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवार दि.१२ डिसेंबर रोजी आदेश काढले.
या अधिकाऱ्यांमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाचे विशेष भुसंपादन अधिकारी जयश्री माळी, उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी जितेंद्र कुवर, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांचा समावेश आहे. तर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार म्हणून दर्जाचे तहसीलदार (महसूल) ज्योती छबुराव गुंजाळ, अपर चिटणीस विजय पवळू सूर्यवंशी, तहसीलदार सुरेश नामदेव कोळी, जिल्हा करमणूक कर अधिकारी ज्योती रामसिंग वसावे, तहसीलदार (संगायो) उमा सदाशिव ढेकळे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण तहसीलदार विनोद दंगल पाटील यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांमध्ये ७ उपजिल्हाधिकारी, तसेच ६ तहसीलदार यांचा समावेश आहे.









