मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील काही मुले सुकळी शिवारात गेले होते. त्या ठिकाणी मधमाशांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर असून तो जळगाव येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. सदर घटना दि.८ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील सुमारे सहा ते सात तरुण मित्र सुकळी शिवारात गेले होते. त्याठिकाणी अचानक मधमाशांचा हल्ला झाल्याने त्यात सुकळी येथील रवींद्र राठोड (वय २९ वर्षे) आणि योगेश पाटील (वय ४० वर्षे) दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना मुक्ताईनगर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यापैकी रवींद्र राठोड यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यानंतर त्यातील दुसऱ्या जखमी तरुणाला जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.









