जखमी ४२ यात्रेकरूंवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू
जळगाव ( प्रतिनिधी ) – उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर जिल्ह्यात अयोध्या-प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे ४ वाजता एक भीषण अपघात झाला. अयोध्या येथून रामलला दर्शन घेऊन परत येत असलेल्या भाविकांच्या टूरिस्ट बसला वेगवान ट्रेलरने जोरदार धडक दिली. या अपघातात जळगाव शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, ४२ जण जखमी झाले आहेत.

सर्व भाविक हे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ तसेच पारोळा, एरंडोल, धुळे, भुसावळ तालुक्यातील रहिवासी होते. अयोध्या येथे भगवान रामलला दर्शन घेऊन प्रयागराज दर्शनासाठी बसने जात होते. कूरेभार चौकात पोहोचताच एक अनियंत्रित ट्रेलरने बसला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भयानक होती की बस आणि ट्रेलर दोन्ही उलटले. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला.

स्थानिक नागरिक आणि प्रवासी तातडीने मदतीसाठी धावले आणि उलटलेल्या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. सुमारे १५ भाविकांना गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमींना अॅम्ब्युलन्सच्या मदतीने तातडीने कूरेभार सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉ.प्रयेश दीक्षित आणि त्यांच्या टीमने सर्व जखमींच्या उपचाराची सुरुवात केली. उपचारादरम्यान पिंप्राळा परिसरातील रहिवासी छोटीबाई शरद पाटील (५५) या महिलेचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच कूरेभार पोलिस टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी महामार्गावर उलटलेली बस आणि ट्रेलर काढण्यासाठी क्रेन बोलावली आणि बचावकार्य सुरू केले. पोलिस सध्या घटनेच्या कारणांची तपासणी करत आहे. प्रशासनाने जखमींना शक्य तितकी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
जखमी झालेले यात्रेकरू
सुरेखा दगडू पाटील (वय ४०), दगडू धुडकू पाटील (वय ४८), संगीता रवींद्र पाटील (वय ५०), रमाबाई भारत पाटील (वय ६५), अर्चना सुधाकर पाटील (वय ४२), सुमनबाई बुधा पाटील (वय ६६), संजय प्रताप पाटील (वय ६०), भारत दगडू पाटील (वय ७०), नीता महेंद्र पाटील (वय ६२) योजना पद्मसिंग पाटील (५३) पद्मसिंह हरसिंग पाटील (५८), कोकीळाबाई नाना पाटील वय (६५), आशाबाई बाळू पाटील (वय ७०), सुमित्रा भारत पाटील (वय ६३),(केसीएन)साधना राजेंद्र पाटील (वय ४८), इंदुबाई मधुकर पाटील (वय ६८), शोभा दगडू पाटील (वय ५४), साहेबराव शेनफळ पाटील (वय ६६), आशाबाई साहेबराव पाटील (वय ६१), रंजनाबाई विजय पाटील (वय ५०, सर्व रा.कल्याणीहोळ ता. धरणगाव), आशाबाई चंद्रसिंग पाटील (वय ५०), संगीता हरी पाटील (वय ४५), सुमनबाई पाटील वयसाठ भारती पाटील (वय ६०, सर्व रा. कन्हेरे ता पारोळा).
सुलबाई महेंद्र राजपूत (वय ४४), अनिता सुनील पाटील (वय ४०, राहणार बाबेर ता. धुळे), कल्पना रामसिंग पाटील (वय ५५), रामसिंग दगडू पाटील (वय ६४, दोन्ही रा. फुलपाट ता. धरणगाव) निशाबाई कैलास पाटील (वय ५५), आशाबाई सुपर पाटील (वय ५० दोन्ही रा. रामेश्वर), संगीता ठाणसिंग पाटील (वय ५०, रा. वडगाव ता. पाचोरा), मंगलबाई नाना पाटील (वय ४५, रा.सारोळा ता.पाचोरा), दिपाली कैलास पाटील (वय ३६, निमगाव ता. यावल), अरुणा भारत पाटील (वय ५०) भारत पाटील (वय ५७ दोन्ही रा. मोहाडी ता. पारोळा),(केसीएन)अलका चौधरी (वय ५५ रा. पिंपळकोठा ता. एरंडोल), भारत लक्ष्मण पाटील (वय ५६), अलकाबाई भारत पाटील (वय ६०, दोन्ही रा.जवखेडा ता. एरंडोल), रत्नाताई पाटील (वय ५२, रा.नाशिक), मंदाबाई सुखदेव पाटील (वय ६०, रा.खडकी ता. एरंडोल) जनाबाई पाटील (वय ६२ रा.पुणे), वंदना पाटील (वय ६० रा. वरणगाव).









