पारोळा तालुक्यातील आडगाव फाट्यावरील घटना
पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील आडगाव फाट्याजवळ कारचा पुढील टायर फुटल्याने वाहन पलटी होऊन अपघात झाला. यात आठजण जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.
पारोळा तालुक्यातील आडगाव फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कारचा (एमएच०२/एक्स२९२६) पुढील टायर फुटल्याने वाहनात बसलेले रोहन समउद्दीन पिंजारी, सुरेश नाना सोनवणे, विशाल उत्तम जाधव, सुनील जमदार पावरा, साहिल पिंजारी, अनिल जाधव, मयूर वसंत मोरे (सर्व कळमडू, ता.चाळीसगाव) हे आठजण जखमी झाले आहे. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कारमधील सर्वजण कापसाची गाडी भरण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. याबाबत रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.









