पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील अंमळनेर रस्त्यालगत असलेल्या पेंढारपुरा भागात एका चार वर्षीय मुलीच्या गच्चीवर खेळत असताना पायऱ्यांवरून पडल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रोजी घडली.
याबाबत गोरख धोबी यांची कन्या कोमल दत्तात्रय वाघ ( वय ४ वर्ष ) हिचा जिन्यावरून खेळत असताना पडल्यामुळे डोक्यात मार लागून मृत्यू झाला. तिला जखमी अवस्थेत प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर नागरिकांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.









