चाळीसगाव शहरातील विद्यालयातील घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधील चंपाबाई कळत्री विद्यालयात बोगस मतदान करण्याच्या उद्देशाने आलेल्या तोतया मतदाराविरुध्द मंगळवारी रात्री २ वाजता शहर पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे.
या मतदान केंद्रात बूथ क्र. ७ खोली क्र. ३ येथे २ रोजी दुपारी ममराज हरिलाल जाधव (चाळीसगाव) हा मतदान करण्यासाठी दुसऱ्याचे कार्ड घेऊन आला होता. तो मतदान केंद्रात आल्यानंतर मतदान अधिकारी शरद अमृतकार यांनी मतदाराला नाव व ओळखपत्र विचारले असता त्याने त्याचे नाव ज्योतीराम नान्वर (चाळीसगाव) असे सांगितले. त्याचवेळी त्याने नाव सांगितल्यानंतर तेथे उपस्थित असलेले उमेदवार घृष्णेश्वर पाटील यांचे मतदान प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील यांना हा मतदार चुकीचा असल्याचा संशय व्यक्त केला.
त्यावेळी मतदान अधिकारी क्र. २ यांच्याकडे शाइ लावण्याच्या व नाव नमूद करत असताना मतदान अधिकारी क्र. १ यांना संशासपद वाटल्याने आणि प्रतिनिधीना तो खोटे बोलत असल्याच्या शंकेमुळे मतदान अधिकाऱ्यांनी त्याचा मोबाइल क्रमांक मागितला. त्याने नंबर दिला तेव्हा त्याचे नाव ममराज जाधव असल्याचे लक्षात आले. त्यामुळे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









