डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यशस्वी
जळगाव (प्रतिनिधी) :- झोपेत असताना अचानक उलटी होऊन बेशुद्ध पडलेल्या ६५ वर्षीय रूग्णाला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका शल्यचिकित्सकांनी तातडीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे जीवदान दिले.याबाबत माहिती अशी की, ाळू गोसावी नामक ६५ वर्षीय रुग्ण झोपेमध्ये असताना अचानक उलटी झाली आणि त्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत गेला. अशा परीस्थितीत रूग्णाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी मेंदू व मणका शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड यांनी रूग्णाची तपासणी केली असता रक्तदा तब्बल २०० पर्यंत वाढलेला असल्याचे दिसून आले. उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिन्या फुटून ्रेन हेमरेज झाल्याचा संशय डॉक्टरांना आला. त्यानुसार पुढील निदानासाठी त्याची एमआरआय तपासणी करण्यात आली. एमआरआय रिपोर्टमध्ये छोट्या मेंदूत पाण्याचा दबाव वाढलेला असून गंभीर स्वरूपाचे ब्रेन हेमरेज असल्याचे स्पष्ट झाले. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने रुग्णाला तातडीने शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आले. यानंतर मेंदू व मणका शल्यचिकित्सक डॉ. विपूल राठोड यांच्या तज्ज्ञ टीमने स-ऑक्सीपीटल कॅनोटोमी अॅन्ड इव्हॅक्युएशन ऑफ हिमॅटोमा ही जटिल आणि अत्यंत नाजूक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. मेंदूमध्ये झालेली रक्तस्रावाची गाठ (क्लॉट) काढून मेंदूवरील वाढलेला दबाव कमी करण्यात आला. ही शस्त्रक्रिया वेळेवर झाल्याने रुग्णाला मृत्यूच्या दारातून पुन्हा जीवन मिळाले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पुढील काही दिवस डॉक्टरांनी रक्तदाब नियंत्रण, मेंदूतील सूज कमी करणे आणि संक्रमण टाळणे यासाठी विशेष काळजी घेतली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सतत देखरेखीमुळे आणि योग्य औषधोपचारामुळे रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारत गेली. फक्त आठवडाभरात रुग्णाची प्रकृती ठणठणीत झाली कुटुंबीयांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचार्यांचे मनापासून आभार मानले आहेत. या शस्त्रक्रियेसाठी मेंदू व मणका शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड यांना डॉ. अतुल जाधव, डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. व्ही. सतीश, डॉ. मारीया फर्नांडीस, डॉ. विधीसा, डॉ. साक्षी, शालीक चौधरी यांनी सहकार्य केले.
रुग्णाची स्थिती रूग्णालयात आणल्यानंतर अत्यंत गंभीर होती. छोटे मेंदू म्हणजेच सेरेबेलममध्ये रक्तस्राव झाल्यास काही मिनिटेदेखील महत्त्वाची ठरतात. तातडीने एमआरआय करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्यानेच रुग्णाचे प्राण वाचू शकले. शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती, मात्र टीमवर्कमुळे आम्हाला हा यशस्वी परिणाम मिळाला, – डॉ. प्रितम दास, निवासी.









