महावितरण कार्यालयात दिव्यांग दिन’ साजरा
जळगाव (प्रतिनिधी) :- महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात दि. ०३ डिसेंबर रोजी ‘जागतिक दिव्यांग दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महावितरणमधील दिव्यांग अधिकारी / कर्मचारी यांना श्री आय.ए.मुलाणी मुख्य अभियंता यांच्या हस्ते अनुकूलित वाहनांचे वितरण करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने नंदूरबार मंडलातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
बुधवारी झालेल्या या विशेष कार्यक्रमास मुख्य अभियंता श्री आय. ए. मुलाणी यांच्यासह जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, अधीक्षक अभियंता, पायाभूत आराखडा मनोज विश्वासे, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरुंगे, कार्यकारी अभियंता मानसी सुखटनकर, चेतन नंदनवार कार्यकारी अभियंता (प्रशासन) जळगाव मंडल, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) गणेश लिधूरे, अमित सोनवणे व.व्यवस्थापक (विवले), तन्वी मोरे व्यवस्थापक (मासं) तसेच दिव्यांग प्रहार संघटनेचे अध्यक्ष श्री रविंद्र सोनवणे यांच्यासह संघटने पदाधीकारी वर्ग व इतर सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जागतिक दिव्यांग दिन’ साजरा करण्यासोबतच दिव्यांग बांधवांबद्दल महावितरणची संवेदनशीलता व्यक्त करणारा एक विशेष कार्यक्रम यावेळी आयोजीत करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अभियंता श्री आय.ए. मुलाणी, यांनी महावितरणचे परिपत्रके वाटप करत मार्गदर्शन केले आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.
सन्मानित करण्यात आलेल्या दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांमध्ये श्री. विलास भटु पाटील, सहाय्यक अभियंता (नंदुरबार विभाग) श्री. विठ्ठल राजाराम सुर्यवंशी, प्रधान तंत्रज्ञ (नंदुरबार विभाग) श्री. निकलेश अनिल सोनार, वरिष्ठ तंत्रज्ञ (नंदुरबार विभाग) श्री धनलाल दशरथ महाले, प्रधान यंत्रचालक (नंदुरबार विभाग) श्री. नंदलाल आसाराम महाजन, प्रधान तंत्रज्ञ (नंदुरबार विभाग) श्री. सुनिल भगवान पाटील, वरीष्ठ तंत्रज्ञ (नंदुरबार विभाग) श्री. रतिलाल नथ्थु निकम, वरिष्ठ यंत्रचालक (शहादा विभाग) यांचा समावेश आहे.
हा कार्यक्रम महावितरणची आपल्या कर्मचाऱ्यांप्रति असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी दर्शवणारा ठरला. सदरील कार्यक्रम सुधीर म्हसने उपकार्यकारी अभियंता, चेतन तायडे मुख्य लिपीक, जे.डी. पाटील मुख्य लिपीक यांच्या सहकार्याने पार पडला.









