७५ पैकी ३८ जागा महिलांसाठी राखीव; राजपत्रात प्रसिद्ध
महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या या आरक्षण सोडतीनुसार, अनुसूचित जातीच्या ५ पैकी ३ जागा, तर अनुसूचित जमातीच्या ४ पैकी २ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातही २० पैकी १० जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गात ४६ जागांपैकी २३ जागा महिलांना देण्यात आल्या असून, एकूण ७५ पैकी तब्बल ३८ जागा महिलांसाठी ठरल्या आहेत. परिणामी पुरुषांसाठी उर्वरित ३७ जागा आहेत.
महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी प्राप्त हरकती व सूचनांचा अभ्यास करून राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार अंतिम आरक्षणाचे राजपत्र प्रसिद्ध केल्याचे सांगितले आहे.









