उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषदांसह दोन नगर पंचायतींच्या निवडणुकीत मंगळवारी दिवसभर उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडले. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत रांगा लागलेल्या दिसल्या. अखेरीस जिल्ह्याचा एकूण सरासरी मतदान टक्का ६५.५८ टक्क्यांवर स्थिरावला असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.
जिल्ह्यातील १८ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण ४५२ जागांसाठी तब्बल १५६४ उमेदवार रिंगणात होते. सकाळी मतदानास सुरुवात होताच मतदारसंख्येत काहीशी शिथिलता जाणवली. मात्र दुपारनंतर केंद्रांवर मतदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने सायंकाळपर्यंत मतदानाचा टक्का वेगाने वाढला. सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० या वेळेत ८,८१,५१० मतदारांपैकी ३,९६,४०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची नोंद अधिकृत अहवालात करण्यात आली.
पालिकानिहाय मतदान टक्केवारी
जिल्ह्यातील १८ महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदानाचे प्रमाण पुढीलप्रमाणे नोंदवले गेले—
जामनेर – ६०.६८%, भुसावळ – ५४.९१%, यावल – ७३.१६%, फैजपूर – ७२.९१%, पाचोरा – ६८.८२%, वरणगाव – ७२.७१% ,अमळनेर – ६४.४८% , चाळीसगाव – ६२.५८%, सावदा – ६९.९९%, चोपडा – ६७.९७%, भडगाव – ६८.७०%, रावेर – ७४.७४%, धरणगाव – ७२.५४%,
पारोळा – ७२.८७%, नशिराबाद – ६८.११%, मुक्ताईनगर – ६४.४४%, शेंदुर्णी – ६९.८९%.








