नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – तीनसुखीया, आसाममधील तीनसुखीया जिल्ह्यातील बाघजान येथील तेलाच्या विहिरीला मंगळवारी आग लागली. त्याच्या ज्वाला मोठ्या प्रमाणात उसळल्या होत्या. सिंगापूरहून आलेले पथक ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

बाघजान ऑइल इंडिया लिमिटेडच्या तेलविहिरीत मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. गेल्या १४ दिवसांपासून या तेलविहिरीत वायूगळती होत होती. या वायूगळतीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू असतानाच अचानक आग लागली. या आगीचे लोळ आणि धूर अनेक किलोमीटरपर्यंत दिसत आहेत. आगीचा धोका लक्षात घेऊन हजारो लोकांना यापूर्वीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून प्राणी आणि ६ जण जखमी झाले आहेत.







