चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील हिरापूर रेल्वे स्टेशनजवळील पटरीवर ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या प्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत तरुणाची उंची अंदाजे ५ फूट, रंग सावळा, बांधा सडपातळ, केस काळे, चेहरा उभट व नाक सरळ आहे. हाताच्या दंडावर गोलात सूर्याचे चित्र टॅटूच्या स्वरूपात असून अंगात पांढरा शर्ट व काळी पँट असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणाबद्दल माहिती असल्यास चाळीसगाव रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तपास हवालदार पंकज पाटील करत आहेत.









