केवळ सभा नव्हे चाळीसगावकरांच्या मनातील भावना -आ. मंगेश चव्हाण

चाळीसगावात प्रभाग ५ मध्ये जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
चाळीसगाव प्रतिनिधी प्रभाग क्रमांक ५ मधील २९ रोजी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेला आपणा सर्वांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्या मनाला अतिशय भावला. हजारो माता-भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांचे उपस्थित राहून व्यक्त केलेले प्रेम आणि विश्वास यामुळे ही सभा एका प्रभागापुरती न राहता चक्क शहराच्या जाहीर सभेचा भास निर्माण झाला.असे भावनिक उदगार आ. मंगेश चव्हाण यांनी केले .
पण माझ्या दृष्टीने ही केवळ सभा नव्हती हे चाळीसगावकरांच्या मनात दडलेली भावना होती.काहींनी ती सभेत येऊन व्यक्त केली. तर अनेक जण २ तारखेला मतदानाच्या माध्यमातून ही भावना प्रकट करणार आहेत, याची मला खात्री आहे. आपल्या या भावनेला, विश्वासाला आणि पाठिंब्याला माझा मनापासून नमस्कार.
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार चौधरी रुपाली प्रभाकर जाधव युवराज भिमराव (संभा आप्पा)यांच्या प्रचारार्थ आ. मंगेश चव्हाण यांनी २९ रोजी झालेल्या जाहीर सभेत विकासाचे व्हिजन मांडले.
गेल्या तीन-साडेतीन वर्षांत दयानंद पूल, संगम सेतू, घाटरोड रस्ता, प्रभागातील महत्त्वाचे रस्ते अशा अनेक कामांना गती देऊन पूर्णत्वास नेण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आले. आगामी काळात प्रभागातील सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येकापर्यंतहे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपला आशीर्वाद आणि विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे.
२ तारखेला मतदानाच्या माध्यमातून कमळ चिन्हासमोरील बटण दाबून ‘द बेस्ट चाळीसगाव’ घडविण्याच्या माझ्या प्रयत्नांना बळ द्यावे, असे आवाहन आ. मंगेश चव्हाण यांनी केले.









