दिल्ली ( वृत्तसंस्था ) – राजधानी दिल्लीत एका ६५ वर्षीय महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करून तिच्या मृतदेहासोबत अमानुष कृत्य केल्याची हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.
आरोपीने महिलेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह झुडपांमध्ये ओढून नेला आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी विवस्त्र अवस्थेत घटनास्थळावरून पळून गेला.
१५ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती.दिल्लीतील आदर्श नगर रेल्वे स्टेशनजवळील १६ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आली. जीआरपी जवानाला झुडपांमध्ये रक्ताने माखलेला, अवस्थेतील मृतदेह सापडला. महिलेची अवस्था पाहता, हत्येनंतर तिच्यावर अमानुष कृत्य झाल्याचे स्पष्ट झाले.
आरोपी: सलमान (२४), जो यापूर्वी अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी होता. १५ नोव्हेंबरच्या सायंकाळी सलमान दिल्लीत आला होता. दारू पिऊन नशेत फिरत असताना त्याला ६५ वर्षीय महिला एकटी दिसली. त्याने महिलेला ओढण्याचा प्रयत्न केला असता तिने विरोध केला. या रागात सलमानने नारळ फोडण्याच्या हत्याराने तिच्या डोक्यावर २-३ वार केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने मृतदेह झुडपांमध्ये ओढून नेत मृतदेहावर बलात्कार केला आणि विवस्त्र होऊन पळून गेला.
मृत महिला ही होलंबी कलान येथे राहत होती. ती पतीपासून वेगळी राहत असून, आजादपुर मंडी परिसरात मजुरी करत असे आणि रात्री स्टेशनजवळ झोपत असे. घटनेच्या रात्री ती मंडीहून स्टेशनकडे जात असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी तपास केला असता दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फूटेजमध्ये एक तरुण चप्पल घालून जाताना दिसला. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. परिसरातील चौकशीत काही लोकांनी त्या तरुणाला ओळखले. तो मूळचा गुजरातच्या भरूचचा असल्याचे समजले. जुन्या रेकॉर्ड्स तपासले असता सलमानचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान सलमानने आपला गुन्हा कबूल केला आहे.
या हादरवून टाकणाऱ्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.









