जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील कृषी महाविदयालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्राचार्य डॉ. शैलेश तायडे व राष्ट्रीय सेवा योजनाचे समन्वयक प्रा. आर डी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेबर रोजी संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविदयालय, मुक्ताईनगर येथील डॉ. आर. एस. शेख हे उपस्थित होते. तसेच शिक्षण व संशोधन संचालक डॉ. ए. पी. चौधरी, प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे, प्रशासकीय अधिकारी मोहन सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. पी. एस. देवरे उपस्थित होते. प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांनी प्रास्ताविक केले. तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्यामध्ये जे भारतीय जवान शहीद झाले त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व तसेच राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.









