जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले. त्यांनी संविधानातील मूल्ये, हक्क आणि कर्तव्ये जाणून घेणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

तसेच संविधान आपल्याला जबाबदार आणि नैतिक नागरिक बनवते, यावर त्यांनी भर दिला. डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नयना महाजन यांनी भारतीय संविधानाचे विस्तृत आणि प्रभावी विश्लेषण केले. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे यांनी केले, तर सूत्रसंचालन विद्यार्थी निखिल पाटील याने केले.









