आ. अमोल पाटील यांच्या प्रचार रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद!
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकुर यांच्यासाठी शक्तीप्रदर्शन
एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीचा प्रचार जोर धरू लागला आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकुर यांच्या समर्थनार्थ आणि प्रभाग क्र. १, ९, आणि १० मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी आमदार अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य आणि उत्साही प्रचार रॅली काढण्यात आली.
या रॅलीत आमदार पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ओम नगर आणि भोई गल्ली परिसरातील श्रीराम मंदिराशेजारी झालेल्या कॉर्नर सभेत त्यांनी महायुतीने एरंडोलमध्ये केलेल्या अभूतपूर्व विकासकामांचा पाढा वाचला.
”२०० कोटींहून अधिक निधी, विकास केवळ करण्यासाठी नाही, तर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी!”
आ. अमोल पाटील यांनी आपल्या भाषणात एरंडोलच्या सर्वांगीण विकासासाठी मागील कार्यकाळात २०० कोटींहून अधिक निधी आणल्याचे ठामपणे सांगितले. “कामे केवळ करण्यासाठी नाहीत, तर नवनवीन संकल्पनांनी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी असतात,” असे ते म्हणाले. ‘पुस्तकांचा बगीचा’ ही संकल्पना राज्यभर गाजल्याची आठवण करून देत, त्यांनी एरंडोलला विकासाच्या मार्गावर अधिक वेगाने नेण्यासाठी नागरिकांना महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
‘या’ उमेदवारांना विजयी करा!
महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकुर यांच्यासह खालील उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून विकासाचा वेग कायम ठेवण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले:
प्रभाग क्र. १ अ: कल्पनाताई पाटील, प्रभाग क्र. १ ब: अभिजित राजेंद्र पाटील, प्रभाग क्र. ९ ब: नितेश कैलास चौधरी,
प्रभाग क्र. १० अ: मनकरनाबाई चौधरी, प्रभाग क्र. १० ब: नय्युम खान दलशेर खान,
या प्रचार सभेला जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील, धरणगाव बाजार समितीचे माजी सभापती शालिक गायकवाड, तालुकाप्रमुख रवि जाधव, पं.स. सभापती दादाजी पाटील, माजी नगराध्यक्ष राजुआबा चौधरी, तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती.









