जळगाव (प्रतिनिधी) – रिंगरोडवरील बांधकामस्थळी ठेवलेल्या सेंट्रींग कामासाठी वापरल्या जाणाऱ्या १७ लोखंडी प्लेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली असून या चोरीमुळे उडाली आहे. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.
यशवंत कॉलनी येथे राहणारे वॉचमन गुड्डू अशोक पांडे हे नियमितप्रमाणे साईटची पाहणी करत असताना लोखंडी प्लेट गायब असल्याचे त्यांना लक्षात आले. परिसरात शोध घेऊनही काहीच सुगावा न लागल्याने त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
१७ प्लेटांचा बेपत्ता तपास सुरू
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, हालचाली आणि संशयीत व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ रवींद्र ठाकरे करीत आहेत.









