दोन आरोपी अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी परिसरात घडलेल्या तब्बल ६१ गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी धडक तपास करत भंडाफोड केला आहे. दोन आरोपींना अटक करून लाखोंचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले आयशर वाहन जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या जलदगती आणि अचूक कारवाईचे शहरभर कौतुक होत आहे.
घटनेत फिर्यादीने भारत पेट्रोलियममधून ३४२ गॅस सिलेंडर भरून १४ नोव्हेंबर २०२५ रोजी एमआयडीसी परिसरात ट्रक पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रक रस्त्याकडेला सापडला मात्र त्यातील ६१ सिलेंडर गायब असल्याचे उघड झाले. यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, गुप्त माहितीद्वारे गुन्हे शोध पथकाने सापळा रचत १८ नोव्हेंबर रोजी शेख फिरोज शेख याकुब (रा. नशिराबाद) व त्याचा साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशफाक (रा. उस्मानिया पार्क) यांना अटक केली. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून ₹1,22,000/- किमतीचे ६१ सिलेंडर तसेच ₹5,00,000/- किमतीचे आयशर वाहन जप्त केले आहे.
ही कारवाई पोनि बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोह गणेश शिरसाळे, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोकों नितीन ठाकुर, पोकों किरण पाटील आणि पोकों शशिकांत मराठे यांचा विशेष सहभाग होता.
ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.








