ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलिसांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव रेल्वे स्थानकावर एका अंदाजे २८ वर्षांच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. रेल्वे पोलिसांनी या घटनेची माहिती दिली असून, नागरिकांना मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.१० वाजण्यापूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावरील नवीन जिन्याखाली (दादऱ्याखाली) एक व्यक्ती आजारी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ऑन-ड्युटी स्टेशन मास्टर श्री. पालरेचा यांनी रेल्वे पोलिसांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिली.
मृताचे वर्णन:- वय: अंदाजे २८ वर्ष, वेशभूषा: अंगात आकाशी चौकटी रंगाचा मळकट शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पँट, शारीरिक ठेवण: शरीर बांधा सडपातळ आणि रंग सावळा,केस/दाढी: केस काळे आणि वाढलेले असून, दाढीही काळी व वाढलेली आहे. ,प्राथमिक तपासानुसार, सदर व्यक्तीचा मृत्यू कोणत्यातरी दीर्घ आजाराने नैसर्गिकरीत्या झाल्याचे दिसून येत आहे.
ओळख पटवण्यासाठी आवाहन:-मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओळख पटवण्यासाठी ठेवण्यात आला आहे. या अनोळखी व्यक्तीची ओळख पटण्यास मदत करू शकणाऱ्या नागरिकांनी रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार सचिन भावसार हे करीत आहेत.










