तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह
दरम्यान, शनिवारी दि. ८ नोव्हेंबर रोजी दिलीप मोरे यांच्या कुटुंबीयांना बेळी गावचे पोलिस पाटील यांनी फोनवरून “तुमचा भाऊ नदीत सापडला आहे” अशी माहिती दिली. कुटुंबीय तत्काळ घटनास्थळी पोहोचले असता वाघूर नदीच्या पात्रात पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून कुटुंबियांनी त्यांची ओळख दिलीप मोरे अशी पटवली.
यानंतर पोलिसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. नशिराबाद पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक रवींद्र तायडे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
या घटनेमुळे बेळी गावात हळहळ व्यक्त होत असून, वाघूर नदी परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.









