८१० रुग्णांची तपासणी करून २१० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी रवाना
जळगाव ( प्रतिनिधी ) – पाळधी तालुका धरणगाव पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून व जि प सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून आज जिपीएस मित्र परिवार तर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबीर आयोजित करण्यात आले होते आज या शिबिराला प्रचंड असा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.या शिबिरात ८१० रुग्णांची तपासणी करून २१० रुग्ण पनवेल येथे शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले.

या शिबिराने आज पर्यंतचे सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले असून सकाळी 7 वाजेपासून गावागावातून आबालवृद्ध नागरिकांनी नेत्र तपासणी साठी गर्दी केली होती.सगळ्यांची अगोदर नोंदणी करून तपासणी करण्यात आली आज या शिबीर मध्ये 810 रुग्णाची नोंदणी करून त्या पैकी 210 रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात पाठविण्यात आले शिबीर मध्ये रुग्णासाठी नाश्ता व जेवण ची सोय सुध्दा ठेवण्यात आली होती *रुग्ण कडून कुठलाच मोबदला न घेता सर्व सेवा मोफत करण्याचे नियोजन केले असून या करिता मा ना गुलाबराव पाटील प्रतापराव पाटील विक्रम पाटील हे सदैव प्रयत्नशिल असतात. अश्या या दृष्टी दान संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून प्रत्येक रुग्ण आमच्या नेत्याला धन्यवाद देत आभार मानत आहे,,,
जीवनात ही घडी अशीच राहू दे आणि आमच्या लाडके नेते गुलाबराव, प्रतापराव, विकी बाबा यांच्या कडून अशीच दृष्टी दान ची सेवा होऊ दे हीच पांडुरंगी चरणी प्रार्थना
या शिबिर साठी शंकरा हॉस्पिटल डॉ.राहूल चौधरी,डॉ.विजय बामणे, ,डॉ.रामदास पवार, डॉ.साक्षी चिनके, डॉ . श्रुती शर्मा,डॉ. समृद्धी साळवी, डॉ.भूपेंद्र वाघ, डॉ. अक्षय पारधी यांच्या सह पाळधी आरोग्य केंद्र चे सर्व कर्मचारी आणि जिपीएस मित्र परिवार ,शिवसेना युवासेना यांनी अपार मेहनत घेतली.
*जशी आमच्या नेत्याची महाराष्ट्र भर पाणी वाला बाबा म्हणून ओळख आहे तशीच आता दृष्टी देणारा बाबा अशी ओळख निर्माण होत आहे. अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.









