जळगांव (प्रतिनिधी )- ग्लोबल फॉउंडेशन कडून समाजातील कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला . फुटपाथ वर भाजी विक्रेत्या, पोलीस दलात कार्यरत, एस.टी. महामंडळ तसेच सरकारी हॉस्पिटल मधील महिला कर्मचारी. ज्या महिला दिवस रात्र काम करून सामाजाचे रक्षण करतात अश्या महिलांचे ग्लोबल फॉउंडेशन जळगांव तर्फे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना स्कार्प (मोठे रुमाल ) देण्यात आले त्याच बरोबर रस्त्यावरील धुळी पासून संरक्षण व्हावे तसेच कोरोना व्हायरस पासून रक्षण व्हावे म्हणूण त्यांना मास्क वाटप करण्यात आले. कोरोना वायरस पासून कसा बचाव केला जाऊ शकतो या बद्दल ची माहिती देण्यात आली. यावेळी ग्लोबल फॉउंडेशन च्या अध्यक्षा सौं श्रद्धा नेवे ,सौं रुपाली नेवे, सौं सुनीता दलाल, सौं पौर्णिमा दलाल, सौं सविता तायडे व अक्षिता नेवे यांच्या तर्फ सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम सफल करण्या साठी वैभव नेवे, नवीन दलाल, विलास नेवे यांचे मार्गदर्शन लाभले.