धरणगाव शहराजवळ घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेखाली आल्याने धरणगाव येथील २४ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता समोर आली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुभम भिकन मराठे (वय २४ रा. मराठे गल्ली, धरणगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. शुभम मराठे हा तरूण कुटुंबासह धरणगाव शहरातील मराठे गल्लीत वास्तव्याला होता. मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शुभम हा धरणगाव शिवारातील रेल्वे रूळावरून जात असतांना त्याला धावत्या रेल्वेचा धक्का लागला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आणि त्यानंतर मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.









