जामनेर पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीस जामनेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अकरम शहा असे अटक करण्यात आलेल्या जामनेर येथील बिस्मिल्ला नगरातील रहिवासी असलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

अटकेतील अकरम शहा हा पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार आहे. शहापुर ता. जामनेर येथील रहिवासी असलेले सुरेश रामदास डोंगरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने व मोबाईल असा ऐवज चोरुन नेला होता. या घटनेप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होता. पोलिस निरीक्षक मुरलीधर माधव कासार यांनी या गुन्ह्याचा कसून छडा लावत आपल्या सहका-यांच्या मदतीने अकरम शहा यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसून विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबुल केला.
ताब्यातील अकरम शहा यास पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने गुन्ह्यातील रोख रक्कम, सोने व मोबाईल असा एकुण ७४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल देखील काढून दिला. पोलिस निरीक्षक मुरलीधर माधव कासार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी पो.कॉ. सचिन महाजन, पोकॉ विशाल लाड, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ अमोल पाटील, मपोकॉ आशा पांचाळ, चालक पोना चंद्रशेखर नाईक आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक किशोर पाटील करत आहेत.









