पहुर ;- तालुक्यातील पहूर पेठ ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच निताताई पाटील यांच्या प्रयत्नामुळे गेल्यावर्षी वाघुर नदीमधील डोह पाणी फाउंडेशन या माध्यमातून खोलीकरण केल्यामुळे यावर्षी पहूर गावाला आठवला नाहीत दुष्काळ टँकर मुक्त झाले . गाव त्यामुळे गावांमध्ये विहीर व आड तसेच बोरिंग यांना पाण्याचा आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने गावातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे . लोकनियुक्त सरपंच निता पाटील तसेच त्यांचे पती सेंटर रेल्वे बोर्डाचे सदस्य रामेश्वर पाटील ग्राम विस्तार अधिकारी डी पी टेमकर त्यांचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्यातून गावाला आठवड्यातून प्रत्येक भागाला दोन वेळेस जनतेला पाणीपुरवठा करण्यात येत आहे . गाव टॅंकर मुक्त झाल्याने लोकनियुक्त सरपंच निता पाटील व त्यांचे ग्रामपंचायत सदस्यांचे गावकऱ्यांनी यांनी कौतुक केले असून गेल्यावर्षी पाणी फाउंडेशन या माध्यमातून गावातील डोह तसेच आजुबाजू शेतातील नाल्यातील पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम राबविल्यामुळे गावातील सर्व आजूबाजूचं शेतातील विहिरींना भरपूर पाणी आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा ग्रामपंचायत कौतुक केले असून तसेच गेल्या दोन दिवसापासून गावातील बाजार पट्टा शाळा समशान भूमी आदी ठिकाणी झाडे लावण्याचा कार्यक्रम ग्रामपंचायत माध्यमातून घेण्यात आला असून तसेच गावात नेहमी फवारणी केल्या जाते तसेच गावातील दिवाबत्ती रेगुलर लावल्या जात असल्यामुळे गावामध्ये रात्रीसुद्धा चमक दिसते. गावाच्या विकासासाठी लोकनियुक्त सरपंच निता पाटील त्यांचे पती रामेश्वर पाटील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक टेमकर आदी प्रयत्न करीत आहे.