भडगांव (प्रतिनिधी) – यशस्विनी सामाजिक अभियान प्रमुख़ नगरसेविका योजना पाटील यांना दि. 8 मार्च 2020 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त धुळे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीच्या वतीने सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्याबद्दल राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अध्यक्षस्थानी नाशिक एम.व्ही.पी.संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाले होते.आमदार मंजुलाताई गावित यांचे हस्ते गोपीचंद पाटील,संजय भामरे,आर.डी.पाटील,विलास झालटे,डी.आर.पाटील,डी.बी.पाटील,प्रेमकुमार अहिरे आदि मान्यवर पदाधिकारी,समिती सदस्य यांच्या प्रमुख़ उपस्थितित प्रदान करण्यात आला.योजना पाटील या शासकीय महिला दक्षता व महिला बालकल्याण समिती मार्फत कौटुंबिक समस्या,सलोखा,शांतता,सुरक्षा,समता , बंधुता व समाजसेवेसाठी सदैव अग्रेसर असतात.नगरपरिषदेंकडून विविध विकासकामे,निराधार,गरजुसाठी शासकीय लाभ मिळूउन देण्यासाठी सतत कार्य करीत राहतात.’जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हे माझे ब्रीद आहे.असे त्या आवर्जून नमूद करतात.योजना पाटील यांचा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर,डॉ,सतीश पाटील,आमदार,माजी आमदार दिलीप वाघ,आमदार किशोर पाटील,कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,पीटीसी संस्थेचे चेअरमन संजय वाघ,बाजार समिती सभापती सतीश शिंदे,तहसीलदार माधुरी आंधळे,पी.आय.धनंजय येरुळे,मुख्याधिकारी विकास नवाले,आरोग्य अधिकारी डॉ.पंकज जाधव आदि मान्यवरांनी अभिनंदन व शुभेच्छया दिल्या आहेत.