जामनेर तालुक्यातील भागदरा गावात घटना
जामनेर (प्रतिनिधी) : – तालुक्यातील भागदरा येथे एका तरुणाने कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली. संबंधित पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश नामदेव कांबळे (३५ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रकाश कांबळे हा तरुण काही दिवसांपासून वाढत्या कर्जबाजारीपणामुळे मानसिक तणावाखाली होता. या तणावाला कंटाळून त्याने काल रात्री विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला जळगाव येथे तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या घटनेमुळे संपूर्ण भागदरा गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.