अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील गडखांब रस्त्यावर दुचाकीवर जाणाऱ्या तरुणाला भरधाव जाणाऱ्या लक्झरीने धडक देऊन फरपटत नेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १८ रोजी घडली आहे. याप्रकारे अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील गडखांब येथील दिनेश सदाशिव पाटील (२६) हा तरुण १८ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास गडखांब येथून दहिवद फाट्याकडे दुचाकी (एमएच१९/सीपी२९८७) वरून जात असताना चोपड्याकडून अमळनेरकडे जाणाऱ्या लक्झरी बसने (एमएच०९/इएम९०६३) भरधाव वेगाने ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली आणि दुचाकीसह ५० फूट फरफटत नेले. मागून येणारे तरुणाचे काका आणि इतरांनी ट्रॅव्हल्स थांबवली असता, दिनेश हा दुचाकीसह बंपरच्या खाली अडकला होता. लोकांनी त्याला बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. मयत तरुणाचे काका विनोद भागवत पाटील दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात लक्झरी चालक चुनीलाल सुभाष बडगुजर (चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हेकॉ. विजय भोई हे करीत आहेत.