भुसावळ शहरातील टेक्निकल हायस्कूलसमोर घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील टेक्निकल हायस्कूल समोरील गायत्री पान सेंटर जवळ झालेल्या भीषण अपघातात एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. मात्र या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दीपक पंडित करोले (वय ३५, रा. राहुल नगर, पांडुरंग टॉकीज जवळ, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. दीपक करोले याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. जळगावकडे जाणारा ट्रक (क्रमांक एम.पी. ६८ झेड डी ३५१४) हा वेगात जात असताना जळगाव नाक्याकडे दुचाकीने (क्रमांक एम.एच. १९ बीडब्ल्यू ३३३२) जाणारा दीपक पंडित करोले याच्या दुचाकीस ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत दुचाकी घसरून दीपक करोले ट्रकच्या चाकाखाली सापडला.
यात तो गंभीर जखमी झाला. तत्काळ नागरिकांच्या मदतीने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर येथे हलविण्यात आले होते.