बोदवड तालुक्यात नाडगाव येथील घटना
अशोक झांबरे यांचे घर सुरुवातीला चोरट्यांनी लक्ष्य केले. रेल्वे खात्यात नोकरीला असलेले झांबरे पुण्यात नातलगांकडे गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २२ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. नंतर झांबरे यांच्या शेजारी राहणाऱ्या संगीता पाटील यांच्या घरात मौल्यवान वस्तू आढळून न आल्याने कपाटातील साहित्याची नासधूस करण्यात आली. गजेंद्र नरसिंग पाटील हे बुलढाणा येथे गेले असताना त्यांच्या कपाटात ठेवलेले ४० हजार रुपये रोख आणि सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्या. शिवाय घरातील कागदपत्रे अस्ताव्यस्त टाकण्यात आली.