पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडून कौतुक
जळगाव ( प्रतिनिधी ) :- जिल्हा क्रीडाधिकारी व युवक सेवा संचलनालयातर्फे घेण्यात आलेल्या शालेय, जिल्हा आणि विभागीय स्पर्धांमध्ये पोलिस जलतरण तलावाच्या विद्यार्थी खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या सर्व विजेत्या खेळाडूंची लातूर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य (पुणे) यांच्यामार्फत नुकत्याच शालेय, जिल्हास्तरीय आणि विभागीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये पोलिस जलतरण तलावातील प्रशिक्षक जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. या विजेत्या जलतरणपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली राज्यस्तरीय विभागस्तरीय स्पर्धेत रोहन अहिरे, स्वराली काळे, दुर्वा भारुडे, विमल मेढे, प्रीतम पाटील, आयशा पठाण, जिविका सोनवणे, लावण्या चव्हाण, दीक्षिता अटारटे या खेळाडूंनी प्रावीण्य प्राप्त केले आहेत. या सर्व जलतरणपटूंची १६ ऑक्टोबरपासून लातूर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांसाठी निवड करण्यात आली असून, आज या खेळाडूंचा संघ प्रशिक्षक संदीप पाटील यांच्यासह लातूरसाठी रवाना झाला आहे.
विभागीय स्पर्धेत विजयी ठरलेल्या या जलतरणपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने या सर्व जलतरणपटूंनी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली. पोलिस अधीक्षकांनी या सर्व खेळाडूंचे कौतुक करून राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. अपर अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक नितीन गणापुरे, अरुण आव्हाड, पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहायक निरीक्षक योगिता वानखेडे, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांनीही कौतुक केले.