जळगाव तालुक्यातील भोकर येथील घटना
प्रकाश नाना बारेला (वय ४५ रा. भोकर ता. जळगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे. तालुक्यातील भादली ते भोकर रस्त्यावरून प्रकाश बारेला हा रविवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास भोकर येथे जाण्यासाठी पायी निघाला होता. त्यावेळी त्यांच्या मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रकाश बारेला याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर दुचाकी चालक हा वाहन घेवून पसार झाला होता. याप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ अनिल बारेला याने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे करीत आहे.